
Vaishno Devi travel: हिंदू धर्मात चैत्र नवरात्रीला खुप महत्व आहे. यंदा चैत्र नवरात्र 30 मार्चला सुरू होऊन 7 एप्रिल रोजी संपणार आहे. या दरम्यान अनेक लोक देवदर्शनाला जाण्याचा प्लॅन करतात. चैत्र नवरात्रीत माता दुर्गेच्या प्रसिद्ध मंदिरांना भेट देण्याचा विचार करतात तेव्हा सर्वात आधी वैष्णो देवीच्या तीर्थयात्रेला निघतात. नवरात्रीत वैष्णोदेवी यात्रेसाठी मोठ्या प्रमाणात भाविक येतात.
जेव्हा भाविक वैष्णो देवीच्या यात्रेला जातात तेव्हा ते देवीचे दर्शन घेतल्यानंतरच घरी परततात परंतु त्याच्या सभोवतालच्या अनेक अद्भुत गोष्टींचा आनंद घेण्यास विसरतात. तुम्ही यंदा वैष्णो देवीला जात असाल तर पुढील गोष्टींचा आनंद घेऊ शकता.