केरळचे वायनाड पर्यटनासाठी आहे प्रसिध्द; जाणून घ्या माहिती

वायनाडमध्ये बदलले. येथे बारमाही नद्या वाहतात. तसेच हवामान देखील अनकुल असल्याने वायनाड वर्षभर हिरवळ दिसते.
wayanad
wayanadwayanad

जळगाव ः भारतातील (India) पर्यटनासाठी (Tourism) प्रसिद्ध राज्यात केरळ राज्य (State of Kerala) हे पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहे. येथे जोडप्यांव्यतिरिक्त, कौटुंबिक सहलीसाठी देखील हे एक उत्तम ठिकाणे आहेत. त्यात वायनाडचे स्वतःचे आकर्षण आहे. हे केरळमधील हे सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. वायनाड मधे वर्षभर वातावरण अतिशय आनंदी असल्याने येथे पर्यटकांच्या पहिल्या पसंतीचे असते. जवळच बेंगळुरू, म्हैसूर, चेन्नई आणि कोचीसारख्या ठिकाण आहे. तसेच तामिळनाडू (Tamil Nadu) राज्यातील पर्यटकांचे देखील हे ठिकाण पसंतीचे आहे. चला तर जाणून घेवू वायनाडशी संबंधित माहिती..

( india most famous for tourism space kerla is wayanad district)

वायनाड हा सिमेवारील जिल्हा

केरळमधील वायनाड हा जिल्हा तामिळनाडूच्या सीमेवर आहे. त्यामुळे केरळ व तामिळनाडू राज्यातील पर्यटक वायनाडला भेट देण्यासाठी मोठ्या प्रमाणात येत असतात.

वायनाड नाव म्हणजे काय ?

वायनाड हा शब्द 'वायल' आणि 'नाडू' या दोन मल्याळम शब्दांमधून आला आहे. याचा अर्थ 'भात शेती' आणि 'देशाची जमीन' असा होतो. हा प्रदेश भातशेती म्हणून ओळखला जातो. त्यामुळे वायल नाडू असे नाव पडले, आणि ते वायनाडमध्ये बदलले. येथे बारमाही नद्या वाहतात. तसेच हवामान देखील अनकुल असल्याने वायनाड वर्षभर हिरवळ दिसते.

काचेचे अद्वितीय मंदिर

वायनाडमधील कुट्टामुंडा येथील काचेचे मंदिर हे प्रसिध्द आहे. हे जैन मंदिरातील तिसरे तीर्थंकार पार्श्वनाथ स्वामी यांना समर्पित आहे. या मंदिराचे वैशिष्ट म्हणजे हे आरसाचे मंदिर आहे. विचित्र वाटते, परंतु हे खरे आहे. मंदिराच्या आतल्या भिंतींना शेकडो आरशांनी सुशोभित केले आहे. मूर्ती स्वामी आणि पद्मावती देवी स्थापीत आहे.

समुद्र किनारपट्टी, आणि रेल्वे नाही

केरळ राज्याला विस्तृत समुद्र किनारपट्टी आहे. मात्र वायनाड मात्र यापासून दूर आहे. तसेच वायनाडविषयी आणखी एक मनोरंजक सत्य म्हणजे हे ठिकाण अद्याप रेल्वेने जोडलेले नाही. याच कारण म्हणजे वायनाडचे संपूर्ण भूभाग हा वनक्षेत्र आहे, जे वन्यजीवांसाठी आहे. सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन कोझिकोड येथे 110 कि.मी. अंतरावर आहे.

भारतातील एकमेव पृथ्वी धरण

वायनाडमधील बनसुरा सागर धरण हे भारतातील एकमेव पृथ्वी धरण आहे. आशियातील हे दुसरे सर्वात मोठे धरणे आहे. येथे बनसुरा टेकड्यांचा थरारक दुष्यांचा देखील तुम्ही आनंद घेवू शकतात. तसेच येथे स्पीड बोटिंग आणि कॅम्पिंग देखील अनुभवू शकता.

पाइन वन

केरळमधील वायनाड जिल्ह्यातील मानथवडीतील चंदनथोड येथे पाईन वन आहे. हे हे केरळचे एकमेव पाईन वन आहे. जे पाइनच्या सुगंधात सोबत तुम्हाला डोंगरांवर ट्रेकिंगचा आनंद घेऊ शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com