esakal | भारतातील या रहस्यमयी जंगला बद्दल माहिती आहे का ? नाही..तर जाणून घ्या
sakal

बोलून बातमी शोधा

भारतातील 'या' रहस्यमयी जंगलाबद्दल माहिती आहे का ?

भारतातील 'या' रहस्यमयी जंगलाबद्दल माहिती आहे का ?

sakal_logo
By
भूषण श्रीखंडे

जळगाव : पृथ्वीचे खरे सौंदर्य हे पृथ्वीवरील निसर्ग आहे, त्यात नदी, नाले, झाडे, समुद्र, जंगल (Forests in India) हे आहेत. यात सर्वात महत्वाचे घटक हे जंगल आहे. जिथे कोट्यावधी प्राणी, जीव, आणि वनस्पतीचे अचंबित करणारे रुप आपणास पाहण्यास मिळत असतात. त्यात भारतात गुजरातपासून अरुणाचल प्रदेशपर्यंत आणि जम्मू-काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत अशी घनदाट व अचंबित करणारे जंगल आहेत. तर चला जाणून घेवू अशा रहस्यमय (Mysterious Forests in India) आणि हिरव्यागार हिरवाईने नटलेल्या जंगलांची माहिती..

सुंदरवन जंगल

पश्चिम बंगालमधील गंगा नदीच्या सुंदरवन डेल्टा भागात भारतातील सर्वात प्रसिध्द व घनदाट आणि रहस्यमय जंगल हे सुंदरवन आहे. हे एक लाख चौरस किमीपेक्षा जास्त भागात पसरलेल्या या जंगलात बंगाल टायगरसह अनेक वन्य जीव पाहण्यास मिळतात. या जंगलात गंगा आणि मेघना नदीसारख्या नद्या वाहून त्या समुद्राला मिळतात. ज्यामुळे या गोष्टी आणखी रहस्यमय (Haunted forests in India) बनतात कारण या नद्या कधीही त्यांचा आकार बदलत नाहीत.

नामदफा वन

ईशान्येकडील सर्वात सुंदर राज्य असलेल्या अरुणाचल प्रदेशमध्ये नामदफा वन आहे. संपूर्ण उत्तर भारतात तसेच हिंदुस्थान यासारखे घनदाट आणि रहस्यमय जंगले नाही असे म्हटले जाते. तसेच आसाममधील काझीरंगा जंगलास कधीकधी रहस्यमय वन म्हणूनही संबोधले जाते. नामदफाच्या जंगलचे सातशे चौरस किमीपेक्षा अधिक क्षेत्र आहे. येथे जंगली प्राणी आढळतात आणि त्यामुळे जंगलात जाण्यास नागरीक घाबरतात. (About mysterious forests in India)

कान्हा जंगल

मध्य प्रदेशातील कान्हा जंगल हे आशियातील सर्वात चांगले आणि घनदाट जंगल मानले जाते. सातपुड्याच्या टेकड्यांनी वेढलेले हे जंगल अत्यंत रहस्यमयी आहे. हे जंगल डोंगरावर पसरलेले असल्याने पर्यटकांना इथे जायला भीती वाटते. परंतु अनेक पर्यटक पावसाळ्यात या जंगलात भटकंती व जंगल सफारीसाठी येत असतात. हे जंगल आशियाई वाघांसाठीही प्रसिद्ध आहे.

गीर जंगल

गुजरातमधील गीर जंगल हे भारतातील सर्वात प्रसिद्ध जंगलांपैकी एक आहे. सोमनाथ ते जुनागड दरम्यान वसलेले हे जंगल एशियाई सिंहासाठी प्रसिद्ध मानले जाते. जर तुम्हाला जंगल सफारी करायची असेल तर गिरचे जंगल नंदनवन आहे. हे जंगल डोंगर तसेच मैदानी प्रदेशात पसरलेले आहे.

(Mysterious forest in India)

loading image
go to top