नागरिकांना आता 31 मे पर्यंत पर्यटक स्थळांवर जाता येणार नाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नागरिकांना आता 31 मे पर्यंत पर्यटक स्थळांवर जाता येणार नाही

नागरिकांना आता 31 मे पर्यंत पर्यटक स्थळांवर जाता येणार नाही

जळगाव ः कोरोना संर्सग (corona) देशात (country) वाढत असून अनेक राज्यात दुसरी लाटेचा प्रभाव वाढलेला आहे. त्यामुळे अनेक देशात लॅाकडाऊन (Lockdown) नियम लावलेले आहे. देशात अधिक कोरोनाचा संक्रमण (Infection) वाढू नये यासाठी हे पावले उचलेले असून देशातील पर्यटन (Tourism) देखील बंद करण्यात आलेले आहे. त्यानुसार पर्यटन स्थळे देखील बंद असून भारतीय पुरात्व विभागाने ३१ मे पर्यंत हे स्थळ बंद करण्याचा निर्णय वाढविला आहे.

(until may thirty one tourist destinations will not open)

हेही वाचा: जंगल सफारी करायची..तर या राष्ट्रीय उद्यानात जा !

भारतीय पुरातत्व सर्वेक्षण संस्थेने (एएसआय) 15 मे पर्यंत देशातील सर्व स्मारके, संग्रहालये आणि संरक्षित स्थळे बंद ठेवली आहे. त्यामुळे भारतातील ताजमहालसह सर्व लोकप्रिय पर्यटन स्थळे पाहता येणार नाहीत. केंद्रीय मंत्री प्रहलादासिंग पटेल यांनी हे ट्विट केले आहे.

red fort

red fort

ट्विटमध्ये लिहिले आहे..

भारतीय पुरातत्व सर्वेक्षण संस्थेकडून कोरोना महामारीमूळे 31 मे पर्यंत सर्व पर्यटन स्मारके बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तज्ज्ञांच्या मते, येत्या काळात कोरोना साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन वाढविण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: वर्क फ्राॅम होम..ते ही पर्यटन स्थळावरून; चला जाणून घेवू !

लाल किल्ला देखील बंद

जानेवारी महिन्यात कावळा मृत सापडल्यामुळे दिल्लीचा लाल किल्ला बंद करण्यात आला होता. तेव्हा पासून लाल किल्ला बंद असून आता कोरोनामुळे 31 मेपर्यंत बंद राहणार आहे. दिल्लीमध्ये जवळपास 170 ऐतिहासिक स्थळे आहेत. त्यापैकी कुतुब मीनार, हुमायूंचा थडग आणि लाल किल्ला आहेत. या ठिकाणी पर्यटक अधिक येतात. असे मानले जाते की दररोज सुमारे दहा हजार पर्यटक येतात.

loading image
go to top