मिऱ्या-नागपूरसह मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गांची (Mumbai-Goa National Highway) कामे सुरु असल्यामुळे रत्नागिरीतील किनाऱ्यांकडे येणारा पर्यटक अलिबागसह दापोलीकडे वळत आहे.
रत्नागिरी : तालुक्यातील प्रसिद्ध गणपतीपुळे पर्यटनस्थळावर (Ganpatipule Tourism) मुंबई-पुणेकरांसह पश्चिम महाराष्ट्रातील पर्यटकांचा राबता वाढत आहे. प्रत्येक विकेंडला गणपतीपुळेत पर्यटक (Tourist) येत असल्यामुळे येथील पर्यटन व्यवसाय बहरला आहे. शनिवार, रविवारी सुट्टीच्या दिवसात सुमारे १० लाखाहून अधिक उलाढाल होत आहे.