सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडील भागात कोयना अभयारण्य (Koyna Sanctuary) व सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या निसर्गसंपन्न गाभा क्षेत्रात वासोटा किल्ला वसला आहे.
कास : निसर्गप्रेमी, दुर्गप्रेमी, ट्रेकर्ससह पर्यटकांचा आनंद द्विगुणीत करणाऱ्या वासोटा किल्ल्यासह (Vasota Fort Satara) कोयना जलाशयाच्या (Koyna Reservoir) परिसरातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्रातील पर्यटनास ३० डिसेंबर ते १ जानेवारी या कालावधीत बंदी घालण्यात आली आहे, अशी माहिती सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील बामणोली वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी विजय बाठे यांनी दिली.