Travel Tips : आंध्रप्रदेशची नवी राजधानी आहे City of Destination, असा करा ट्रीपचा प्लॅन

मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी आंध्रप्रदेशच्या नव्या राजधानीची घोषणा
Travel Tips
Travel Tipsesakal

Travel Tips : मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी आंध्रप्रदेशच्या नव्या राजधानीची घोषणा केली आहे. विशाखापट्टणम आता आंध्रप्रदेशची नवी राजधानी असेल. या आधी कृष्णा नदीच्या काठावर असलेले आणि प्राचिन वारसा असलेले अमरावती याची घोषणा झाली होती. पण ते रद्दबातल करून विशाखापट्टणमला नवीन मान्यता देण्यात आली.

Travel Tips
Travel Tips : "व्हिजा मिळवून देणारे देव" परदेशी जाणारे लोक या मंदिरात करतात नवस

पुर्वाश्रमीच्या आंध्रप्रेदश राज्याचे विभाजन होऊन तेलंगणा या नव्या राज्याची निर्मिती झाल्यानंतर हैद्राबाद हे महत्वाचे शहर तेलंगणाला राजधानी म्हणून मिळालं. त्यानंतर आंध्रप्रदेश सरकारने आपली राजधानी अमरावती घोषित करून त्यांच्या नव्या बांधणीसाठी विषेश प्रयत्न केले.

Travel Tips
World Cancer Day : युवकांमध्ये वाढत्या कर्करोगास व्यसन, चुकीची जीवनशैली कारणीभूत

अमरावती मध्ये पाय़ाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी मोठी गुंतवणुक करण्यात आली होती. एन. चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वाखालील टीडीपी सरकारने 2015 मध्ये अमरावतीला राज्याची राजधानी म्हणून विकसित करण्यासाठी शेतकऱ्यांकडून 33,000 एकर जमीन संपादित केली होती. पण त्यांचा निर्णय फिरवून मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी विशाखापट्टणमला राजधानीचा दर्जा दिलाय.

Travel Tips
Child Health : या सवयी बदलल्या नाहीत तर मुलांमध्ये कमी वयात येतो लठ्ठपणा

डेस्टिनेशनचे शहर अशी ओळख असणार विशाखापट्टणम हे एक अतिशय सुंदर ठिकाण आहे. समुद्रकिना-याने वेढलेल्या विशाखापट्टणममध्ये लोक अनेकदा सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी येतात. इथे तुम्हाला सर्व पर्यटन स्थळे पाहायला मिळतील. रामकृष्णम नावाचं बीच तर इथला टुरिस्ट स्पॉट आहे. विशाखापट्टणमच्या बोरा गुहांचा इतिहास 1 दशलक्ष वर्षे जुना असल्याचं मानलं जातं. इथे येणाऱ्या लोकांसाठी हे एक अतिशय लोकप्रिय ठिकाण आहे.

Travel Tips
Healthy Breakfast Recipe: फक्त ५ मिनिटांत तयार होईल हा चटपटीत अन् हेल्दी नाश्ता…

विशाखापट्टणममध्ये अराकू व्हॅली नावाचं एक अतिशय निवांत आणि सुंदर ठिकाण आहे. हे मुख्य शहरापासून 120 किलोमीटर अंतरावर आहे. या भागात तुम्हाला कॉफीचे मळेही पाहायला मिळतील. बंदरांच शहर म्हणून ही विशाखापट्टणमची ओळख आहे. या शहरात पाणबुडीचे संग्रहालयही पाहण्यासारखे आहे. 2011 साली बांधण्यात आलेल्या या संग्रहालयाला INS कुरुसुराच नाव देण्यात आलंय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com