Goa Monsoon Trip: सोनेरी वाळू अन् रूपेरी लाटा.... 'या' 5 कारणांमुळे पावसाळ्यात गोवा ट्रिप बनवू शकता खास
Goa Monsoon Trip: गोवा म्हटले की डोळ्यासमोर समुद्रकिनारे आणि नाईट पार्टी येते. गोव्यात समुद्रकिनाऱ्यासोबतच मंदिर,चर्च, एतिहासिक वास्तू,खाद्यसंस्कृती यासारख्या अनेक गोष्टींचा आनंद घेता येतो. देश -विदेशातील अनेक पर्यटक येथे भेट देण्यास येतात. पण तुम्हाला माहिती आहे का पावसाळ्यात गोवा हा स्वर्गाहूनही सुंदर दिसतो. तुम्हीही पावसाळ्यात फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर जाणून घ्या गोवा हे ठिकाण पावसाळ्यात फिरण्यासाठी का उत्तम आहे.
तुम्हालाही पावसाळ्यात फिरायला आवडत असेल तर गोव्यात पावसाचा आनंद लूटू शकता.
गोव्याचे पावसाळ्यातील निसर्गसौंदर्य
पावसाळ्यात गोव्यातील समुद्रकिनाऱ्यांमध्ये जाण्यात बंदी असली तरी त्याचे नयनरम्य दृश्य पाहू शकता. तुम्हाला जर उसळत्या आणि खळखळत्या लाटांच्या आवाजाचा अनुभव घ्यायचा असेल तर गोव्यातील समुद्रकिनाऱ्यांना नक्की भेट देऊ शकता. जर समुद्राच्या लाटा धोकादायक वाटत असेल तर लगेच दूर जावे.
ऑफ सिझनचा घेऊ शकता फायदा
गोव्याला पावसाळ्यात जाण्याचे आणखी एक महत्वाचे कारण हे देखील आहे. कारण ऑफ सिझन असल्याने पर्यटक कमी येतात. यामुळे हॉटेलचे रेट कमी होतात. तुम्हाला बजेट फ्रेंडली ट्रिप हवी असेल तर गोव्याला पावसाळ्यात जाऊन निसर्गाचा आनंद घेऊ शकता.
गोव्याची संस्कृती
गोव्याला समृद्ध सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. येथील अनेक पारंपारिक सण, उत्सव पर्यटकांना आकर्षित करतात. पावसाळ्यात देखील गोवन संगीत, नृत्याचा आनंद आणि खाद्यपदार्थांचा आस्वाद घेऊ शकता.
गोव्यातील धबधबे
पावसाळ्यात गोव्यातील सुंदर धबधब्यांचा आनंद लुटू शकता. गोव्यात दूधसागर धबधब्याचा आनंद गेऊ शकता. हा धबधबा भारतातील सर्वात उंच धबधब्यापैकी एक आहे. हा धबधबा ३१० मीटर उंचीवरून खाली पडतो. पावसाळ्यात या कारणांमुळे गोवा ट्रिप खास बनवू शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

