हिल स्टेशनवर जाण्याचा विचार आहे? मग, 'या' खास गोष्टी आवर्जुन बॅगेत ठेवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hill Station

जम्मू काश्मीर, शिमला, मनाली, नैनीताल ही अशी सर्व हिल स्टेशन्स आहेत, जी पर्यटकांची पहिली पसंती आहे.

हिल स्टेशनवर जाण्याचा विचार आहे? मग, 'या' खास गोष्टी बॅगेत ठेवा

देशातील अशी अनेक प्रसिद्ध शहरं आहेत, जिथं खूप उष्णता असते, त्यामुळं या शहरांतील लोकांना सुट्टीसाठी वेळोवेळी हिल स्टेशनवर जाणं आवडतं. जम्मू काश्मीर, शिमला (Shimla), मनाली, नैनीताल ही अशी सर्व हिल स्टेशन्स आहेत, जी पर्यटकांची पहिली पसंती आहे. जर तुम्ही देखील भारतातील हिल स्टेशनला (Hill Station) फिरण्याचा किंवा भेट देण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही नेहमी काही 'खास गोष्टी' तुमच्या बॅगेत ठेवाव्यात..

जर तुम्ही भारतातील कोणत्याही हिल स्टेशनला भेट देण्यासाठी तुमची बॅग पॅक करत असाल, तर अशा अनेक महत्त्वाच्या गोष्टी आहेत, ज्या आपण विसरतो. पण, त्या घेणं खूप गरजेचं आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच आवश्यक वस्तूंची यादी सांगणार आहोत, ज्या तुम्ही प्रवासादरम्यान तुमच्या ट्रॅव्हल बॅगमध्ये ठेवाव्यात.

लेदर जॅकेट आणि स्वेटर सोबत घ्या : हिल स्टेशनवर तापमान खूप कमी असते, त्यामुळं लेदर जॅकेट सोबत घ्या. कारण, हे जॅकेट खूप गरम असते. शिवाय, लेदर जॅकेट घालायला देखील चांगलं वाटतं. तसेच तापमान कमी असताना हे जॅकेट तुमचे शरीर उबदार ठेवते. यासोबतच जवळ स्वेटरही ठेवा.

हेही वाचा: बिहारमधील 'या' 5 सर्वोत्तम ठिकाणांना तुम्ही भेट द्यायलाच हवी

बॉडी वॉर्मर बाळगा : बर्‍याच वेळा जास्त स्वेटर घातल्याने समस्या निर्माण होतात आणि अॅलर्जी देखील होते, त्यामुळं जेव्हा तुम्ही हिल स्टेशनवर जाल, तेव्हा नेहमी बॉडी वॉर्मर बाळगा. यासोबतच मफलर किंवा टोपी देखील जवळ ठेवा.

प्रथमोपचार किट सोबत घ्या : अनेकवेळा असं घडतं, की जेव्हा तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्य आणि मित्रांसोबत प्रवास करता, तेव्हा कोणत्या ना कोणत्या कारणानं तुम्हाला प्रवास करताना दुखापत होते. अशा स्थितीत जेव्हाही तुम्ही सहलीला जाल, तेव्हा तुमची ट्रॅव्हल बॅग पॅक करा आणि त्यात प्रथमोपचार किटही सोबत ठेवा.

हेही वाचा: 'ही' आहेत जगातील सर्वात सुंदर पर्यटन स्थळं; एकदा जरुर भेट द्या

सेल्फी स्टिक आणि डिजिटल कॅमेरा घ्या : डिजिटल कॅमेरा ही अशी गोष्ट आहे, जी तुमची सहल खूप खास बनवते. दरम्यान, तुम्ही कुठेतरी प्रवासाला जात असाल, तर कॅमेरासोबतच सेल्फी स्टिक सोबत घ्यायला विसरू नका. बर्‍याच वेळा तुम्ही एकटे फिरत असता, तेव्हा सेल्फी स्किट तुमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरते.

इमर्जन्सी नंबर लक्षात ठेवा : तुम्ही जेव्हाही फिरायला जाल, तेव्हा इमर्जन्सी नंबर नेहमी लक्षात ठेवा. जर तुम्ही हिल स्टेशनला जाणार असाल, तर इमर्जन्सी नंबर सोबत ठेवा, जेणेकरुन गरज पडल्यास त्याचा वापर करता येईल.

loading image
go to top