
चार धाम यात्रेसाठी नोंदणी केल्यानंतर तीर्थयात्रेकरूंमध्ये उत्साह वाढला आहे. 9 लाख लोकांनी यात्रेसाठी नोंदणी केली आहे. चारधाम यात्रेवेळी कोणत्याही प्रकारची अडचण होऊ नये, यासाठी सरकारकडून व्यवस्था करण्यात येत आहे. काही नियम देखील तयार केले जात आहेत, जे सर्व यात्रिकांना पाळावे लागतील. अशा परिस्थितीत, चार धाम यात्रा दरम्यान मंदिरात रील आणि व्हिडिओ बनवण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
चारधाम यात्रेसाठी नोंदणी सुरू होण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. 30 एप्रिलला गंगोत्री-यमुनोत्री, 2 मे ला केदारनाथ धाम आणि 4 मे ला बद्रीनाथ धाम नंतर 25 मे ला हेमकुंडचे दरवाजे उघडले जातील. यात्रिकांच्या सोयीसाठी यात्रा मार्गावर सरकार आणि प्रशासनाच्या वतीने सर्व सोयी-सुविधा दिल्या जातील. मात्र, प्रशासनाच्या वतीने या वेळी यात्रेकरूंसाठी काही नवीन नियम तयार केले आहेत, ज्याचे पालन करणे अनिवार्य असेल.