Vasota Fort trekking guide charges in Maharashtra
esakal
-अर्चना पवार
कास : राज्यातील पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू अन् सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे वैभव असलेला ऐतिहासिक वासोटा किल्ला गुरुवार, दि. १५ ऑक्टोंबरपासून पर्यटनासाठी खुला होत आहे. नैसर्गिक आपत्ती व सुरक्षिततेच्या कारणास्तव हा किल्ला चार महिने पर्यटकांसाठी बंद (How to visit Vasota Fort from Bamnoli) होता. पावसाच्या उघडीपीनंतर सह्याद्रीतील पर्यटनस्थळे पर्यटनासाठी खुली झाली असून, यामुळे रोजगार व पर्यटनवाढीला चालना मिळणार आहे.