
पृथा वीर
मराठवाड्याची भूमी संतांची आहे. तशी जागतिक दर्जाच्या वारसास्थळांची सुद्धा आहे. आपल्या पूर्वजांचे हे वारसास्थळे केवळ प्रेक्षणीय नाही तर यातील तंत्रज्ञान हे आजच्या आधुनिक तंत्रज्ञानावरही मात देणारे आहे. जगप्रसिद्ध वेरूळ लेणी जवळ असणारे वेरूळ येथील शिवालय तीर्थ या नावाने प्रसिद्ध ‘कुंड’ सुद्धा या पारंपरिक तंत्रज्ञानाचे उत्तम उदाहरण. म्हणूनच वेरूळची लेणी नव्हे तर इथले तीर्थकुंड सुद्धा बघण्यासारखेच.