
रामेश्वर विभूते
सोलापूर : अक्कलकोट हे दत्त भक्तांसाठी एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे. श्री स्वामी समर्थ मंदिर येथे भाविकांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू आहे. येथे श्री स्वामी समर्थांच्या चरणांची दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक पदयात्रा करीत असत. तुम्ही देखील अक्कलकोटला जायचे विचार करत असाल तर सोलापुरातील पेशवेकालीन जुन्या श्री दत्त मंदिराचे शिल्प वैभव शिखरावर विविध कोरीव मूर्ती; देवदार अन् सागवानी खांब, कौलारू बांधणी, नगारखाना पाहण्याजोग आहे.