९० च्या दशकातील अनेक रोमॅन्टीक चित्रपट पाहिले. तर त्यातील प्रेमी जोडपी ही स्वित्झर्लंडला गेल्याचे दाखवले गेले आहे. बर्फाच्छदित वसलेले पर्वत, फुलांचे बागिचे, बर्फाळ जमिन अन् सुंदर सरोवरे हे स्वित्झर्लंडचे वर्णन आपण त्या चित्रपटातून डोळ्यात साठवतो.
खरंतर हे नजारे पाहून प्रत्येकाला एकदा स्वित्झर्लंडला जावे असे वाटत असते. भारतात असे अनेक लोक आहेत ज्यांना परदेशवारी करायची आहे. पण, प्रत्येकाला हे शक्य होत नाही. कारण तिकडे जाणे प्रत्येकाला शक्य होत नाही.