Best Winter Tourist Spots: भारतात हिवाळ्यात फिरण्यासाठी ही ठिकाणे एकदम बेस्ट; सहलीचा आनंद होईल दुप्पट

आज आपण अशा काही ठिकाणांबाबत जाणून घेणार आहोत जेथे जाऊन तुम्हाला सहलीचा आनंद दुप्पट झाल्याचा फिल येईल
Winter Tourist Places
Winter Tourist Placesesakal

Tourist Places: हिवाळ्यात थंडगार वातावरण बघून अनेकांना एखाद्या निसर्गरम्य वातावरणात फिरायला जायला आवडते. तर काहींना समुद्रकिनारी जायला आवडतं. हिवाळा हा असा ऋतू आहे जेथे तुम्ही शांतपणे कमी ऊन्हात आणि गार वातावरणात फिरू शकता. आज आपण अशा काही ठिकाणांबाबत जाणून घेणार आहोत जेथे जाऊन तुम्हाला सहलीचा आनंद दुप्पट झाल्याचा फिल येईल.

शिमला - शिमला या ठिकाणी हिवाळ्यात आवर्जून जावे. हिवाळ्यात येथील वातावरण अतिशय रोमँटिक असतं. हिवाळ्यात शिमलामध्ये गार वातावरण आणि आकर्षक हिमवर्षावाचा आनंद तुम्हाला घेता येईल.

गोवा - दिवाळीनंतरच्या पडलेल्या थंडीत गोव्याला जाणे कधीही बेस्ट. या वेळेत समुद्रकिनारी रम्य आणि रंजक वातावरण अनुभवायला मिळतं. तसेच दुपारच्या वेळी थंडीच्या दिवसात तुम्हाला उबही मिळेल. समुद्रकिनाऱ्यांच्या लाटा तुमचं मन प्रसन्न करतील.

अंदमान - अंदमान हे गोव्यापेक्षा फार वेगळं ठिकाण आहे. तुम्हाला जर रिलॅक्स करण्यासाठी सहलीला जायचं असेल तर हे ठिकाण तुमच्यासाठी बेस्ट आहे. हिवाळ्यात फिरण्यासाठी असलेल्या बेस्ट ठिकाणांपैकी एक असे हे ठिकाण आहे. तुम्ही या ठिकाणी वॉटर स्पोर्ट्स करू शकता.

राजस्थान - हिवाळ्यात गरमागरम वातावरणाची मजा घ्यायची असेल राजस्थान हे ठिकाण बेस्ट आहे. राजस्थानची खास संस्कृतीही तुम्हाला या निमित्ताने बघायला मिळेल. येथील खास कागगिरी केलेले कपडे, वूलन स्पेशल वस्तूही मिळेल.

केरळ - साऊथमधील केरळ ट्रिप हे ठिकाण म्हणजे वर्षाच्या शेवट सँताने दिलेली तुम्हाला स्पेशल भेटच समजा. या ठिकाणी असलेल्या हिल स्टेशनवर जाऊन तुम्हाला एकदम बेस्ट वाटेल. तेथील मंदिरात तुम्हाला वेगळीच प्रसन्नता दिसून येईल. स्पाईस टूर हे केरळमधील टॉप अॅक्टिव्हीजमधील एक आहे. बोटीच्या माध्यमातून तुम्ही तिथल्या शिखरांची राईडही करू शकता.

Winter Tourist Places
Road Trip In Foreign: ना फ्लाइटची गरज ना व्हिजाची कटकट; या सात देशांत कारने फिरत घ्या सहलीचा आनंद

गुलमर्ग - हे अतिशय प्रेक्षणिक थंड हवेचे ठिकाण आहे. जगातला स्वर्ग येथे गेल्यावर तुम्हाला नक्कीच आठवेल. अॅडवेंचरस लोकांसाठी हे ठिकाण बेस्ट आहे. हिवाळ्यात या शहरावर जणू बर्फाचं ब्लँकेटच झाकल्याचे जाणवते. हिवाळ्यात हॉलीडेसाठी हे ठिकाण अगदी परफेक्ट आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com