जगातील सर्वात उंच रेल्वे पूल; रेल्वेमंत्र्यांनी शेअर केला सुंदर फोटो

highest bridge Chenab Bridge
highest bridge Chenab Bridge

जगातील सर्वात उंच पुल (worlds highest bridge) हा जम्मू काश्मीरमधील चिनाब नदीवर बांधला जात आहे. या 'चिनाब ब्रिज' (Chenab Bridge) चे बांधकाम सध्या पूर्णत्वाच्या मार्गावर असून सोमवारी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून याचा एक अत्यंत सुदर असा फोटो शेअर केला आहे.

केंद्रीय मंत्र्यांनी फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, 'ढगांच्या वर असलेला जगातील सर्वात उंच आर्क चिनाब पूल. आपण या फोटोमध्ये या पुलाची उंची तर पाहू शकताच सोबतच त्याच्या सभोवताली आलेले ढग देखील यामध्ये दिसत आहेत.

चिनाब नदीवर बांधण्यात येत असलेल्या या पुलाची उंची 359 मीटर असून हा पूल बांधल्यानंतर काश्मीर खोरे हे देशाच्या उर्वरित भारताशी जोडले जाईल. या पुलाचे बांधकाम भारतासाठी मैलाचा दगड ठरू शकते. हा रेल्वे पूल यावर्षी मार्चपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.

highest bridge Chenab Bridge
Hijab Controversy: तिरंगा काढून फडकावला भगवा; प्रकरण चिघळलं
highest bridge Chenab Bridge
स्वदेशी Crayon Snow+ लॉंच; देशातील सर्वात स्वस्त ई-स्कूटरपैकी एक

कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (KRCL) उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंक (USBRL) प्रकल्पांतर्गत या आव्हाणात्मक 111-किमी मार्गावर चिनाब पूल बांधत आहे.जो या खोऱ्याला रेल्वेच्या माध्यमातून उर्वरित देशाशी जोडेल.

या पुलाच्या उंचीचा अंदाज तुम्ही यावरून लावू शकता की तो आयफेल टॉवर (ज्याची उंची 324 मीटर आहे) पेक्षा 35 मीटर जास्त या पुलाची उंची असणार आहे. चिनाब पुलाची लांबी17 स्पॅनसह 1, 315 मीटर असेल, त्यापैकी चिनाब नदीवरील मुख्य कमानीची लांबी 467 मीटर असेल. तसेच या पुलाची आणखी एक महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हा पूल ज्या स्ट्रक्चरल स्टीलपासून बनवला गेला आहे, ते उणे 10 अंश सेल्सिअस ते 40 अंश सेल्शियस तापमानाला तोंड देऊ शकते. म्हणजेच जम्मू आणि काश्मीरच्या हवमानाचा या पुलावर कोणताही परिणाम होणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com