Viral News: एका शर्यतीत हरला अन् आयुष्याचीच शर्यत संपवली... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shocking News

Viral News: एका शर्यतीत हरला अन् आयुष्याचीच शर्यत संपवली...

Nagpur: मुले एखाद्या स्पर्धेत हरले की त्यांना नैराश्य येतं. मात्र त्या नैराश्याने खचून त्यांनी जीव देणे कोणालाही अपेक्षित नसेल. सोळा डिसेंबर रोजी घडलेली ही घटना तुम्हालाही थक्क करेल. १० व्या वर्गातील एका मुलाने डिव्हीजनल गेम्समध्ये यश मिळाले नाही म्हणून तणावात आत्महत्या केली. हा धक्कादायक प्रकार शनिवारी घडला असून मुलाचे वय १६ वर्षे होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील नागपूर डिव्हीजनल गेम्समध्ये धावण्याच्या शर्यतीत हरल्यानंतर १० व्या वर्गातील या १६ वर्षीय मुलाने आत्महत्या केली. शनिवारी झाडाला लटकून या मुलाने आत्महत्या केली. स्पर्धेत नैराश्य आल्याने या मुलाने एवढे टाकाचे पाऊल का उचलले ते अद्यापही कळलेले नाही.

NCRB कडून जारी झालेला विद्यार्थ्यांच्या मृत्यूचा आकडा धक्कादायक

अलीकडेच राष्ट्रीय गुन्हे रेकॉर्ड ब्यूरोने देशबऱ्या जारी केलेल्या आकड्यानुसार आत्महत्येचे प्रमाण वाढतच चालले आहे. देशातीस कोचिंग हब मानल्या जाणाऱ्या राजस्थानच्या कोटामध्ये मेडिकल किंवा इंजिनीयरींगमध्ये करियर घडवणाऱ्या मुलांमध्ये आत्महत्येचे प्रमाण अधिक असल्याचेही दिसून आले.

हेही वाचा: ज्ञानेश्वरीत आहेत HR निगडित व्यवस्थापन सूत्रे...

कोटा या ठिकाणाव्यतिरीक्तही असे अनेक उदाहरण आगेत ज्यात यश न मिळाल्याने मुलांनी नैराश्य आल्याने आत्महत्या केली. तसेच राष्ट्रीय गुन्हे ब्यूरोने जारी केलेल्या रेकॉर्डनुसार विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढतच चालले.