Viral Video : स्मोकिंग करत अल्पवयीन तरुण नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्यावर चढला अन्...

पोलिसांनी या व्हिडीओची दखल घेत आरोपीचा तपास सुरू केला आहे.
Netaji Subhash Chandra Bose statue
Netaji Subhash Chandra Bose statueSakal

छत्तीसगढमधल्या बिलासपूर इथला एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये एक तरुण नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याची विटंबना करताना दिसत आहे. या व्हिडीओबद्दल सध्या नेटकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे. पोलिसांनी या घटनेची गंभीरता ओळखून तपास सुरू केला आहे.

'आजतक'ने दिलेल्या माहितीनुसार, या व्हायरल व्हिडीओमध्ये एक तरुण स्मोकिंग करत सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याजवळ पोहोचतो. त्या पुतळ्यावर चढतो आणि त्या पुतळ्याच्या तोंडाला सिगरेट लावताना आणि स्वतःही सिगरेट ओढताना दिसत आहे.

हा प्रकार बिलासपूर इथल्या सीपत चौक सरकंडा भागात घडल्याचं समोर येत आहे. तसंच पुतळ्याची विटंबना करणारा हा तरुण अल्पवयीन असल्याची माहिती हाती येत आहे. आसपासच्या लोकांनी सांगितलं की, महापुरुषांच्या विटंबनेचं छत्तीसगढमधलं हे पहिलंच उदाहरण नाही. या आधीही अनेकदा असे प्रकार घडले आहेत.

या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी प्रकरणाचं गांभीर्य ओळखत तपास सुरू केला आहे. मात्र, या प्रकरणाची तक्रार पोलिसांकडे येण्याआधीच आरोपीने एक व्हिडीओ करत या प्रकाराबद्दल माफी मागितली आहे. सध्या या पुतळ्याच्या भोवती २४ तास कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com