Video : कुख्यात दहशतवाद्याच्या भावाने घरावर फडकावला तिरंगा; म्हणाला, मला कुणाचा...

स्वातंत्र्यदिनाच्या आणि 'हर घर तिरंगा' या उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर तिरंगा फडकावण्यात आला आहे.
Brother of Terrorist
Brother of TerroristSakal

नवी दिल्ली : दहशतवादी जावेद मट्टू याचा भाऊ रईस मट्टू याने आपल्या घरावर तिरंगा फडकावल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. स्वातंत्र्यदिन आणि केंद्र सरकारच्या 'हर घर तिरंगा' या उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर त्याने आपल्या घरावर तिरंगा फडकावल्याचा व्हिडिओ समोर आला होता. हे काम करण्यासाठी मला कुणी दबाव टाकला नसल्याचंही त्याने ANI या वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं आहे.

दरम्यान, दहशतवादी असलेल्या जावेद मट्टू हा सध्या कुठे आहे यासंदर्भात मला काहीच माहिती नाही, मी त्याला परत येण्याचं आवाहन करतोय, त्याने परत यावं. आम्ही पहिल्यापासूनच हिंदुस्तानी आहोत आणि राहणार असंही त्याने वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं आहे.

Brother of Terrorist
तरुणीला आई बनण्याची संधी देणाऱ्याला मिळणार 2BHK फ्लॅट, कार अन् 30 लाख'; नेमकं काय आहे प्रकरण?

रईस मट्टू याने सांगितलं की, "मी मनापासून तिरंगा फडकावला. यासाठी कुणाचाही दबाव नव्हता. सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा, हम बुलबुले हैं इसके ये गुलिस्तान हमारा. आता इथे विकास झाला आहे. मी पहिल्यांदाच माझ्या घरी बसलो आहे. दरवर्षी 14 ऑगस्टला दुकान 2-3 दिवस बंद असायचे. पण आत्ता तसं नाही. आधीचे राजकीय पक्ष खेळ खेळत होते."

"माझा भाऊ 2009 मध्ये दहशतवादी झाला, त्यानंतर आम्हाला त्याच्याबद्दल काहीच माहिती नाही. जर तो जिवंत असेल तर मी त्याला परत येण्याची विनंती करतो. परिस्थिती बदलली आहे, पाकिस्तान काही करू शकत नाही. हम हिंदुस्तानी थै, हैं और रहेंगे." असा शब्दांत त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

काय आहे हर घर तिरंगा मोहीम?

यावर्षी आपण भारताचा ७६ वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहोत. त्यानिमित्ताने भारत सरकारकडून हर घर तिरंगा मोहीम राबवण्यात आली आहे. त्यानुसार प्रत्येकाने आपल्या घरावर तिरंगा फडकावून सरकारच्या पोर्टलवर फोटो अपलोड करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com