
लंडनमधील आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत समाजाच्या (इस्कॉन) गोविंदा रेस्टॉरंटमध्ये एका व्यक्तीने शाकाहारी नियमांचा भंग करत KFC चिकन खाल्ल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेने हिंदू समाजात तीव्र संताप निर्माण झाला असून, याला सांस्कृतिक आणि धार्मिक अपमानाचा प्रकार मानला जात आहे.