
Air hostess: मुलांनी कष्टाने मिळवलेलं यश कोणत्याही आई-बापाला आभाळाएवढं वाटतं. त्यात लेक एअर होस्टेस असेल तर विचारायलाच नको. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. विमानामध्ये एक एअर होस्टेस प्रवाशांचं स्वागत करत असते. प्रवाशी रांगेत येत असतात, अचानक तिला तिचे आई-वडील दिसतात. मग काय त्या दोघांच्या सन्मानासाठी एअर होस्टेस जे करते, त्यामुळे माता-पित्याची मान नक्कीच अभिमानाने उंचावली असेल.