Amazon-Flipkart Sale : Amazon-Flipkart चा धमाकेदार सेल सुरू, Smartphone, AC, Tv वर मिळतोय मोठा डिस्काउंट

समर सेल दरम्यान जवळजवळ सर्वच प्रोडक्टवर मिळतोय भरगोस डिस्काऊंट
Amazon-Flipkart Sale
Amazon-Flipkart Sale esakal

Amazon- Flipkart Sale :

उन्हाळ्यात कडक उन्हाच्या झळांमध्ये मनाला गारवा देणारा Amazon Great Summer Sale आणि Flipkart Big Saving Days sale सुरू झाला आहे. या सेलमध्ये इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर अफलातून ऑफर दिल्या आहेत. AC,TV,Smartphones वर 50 ते 80 टक्के सूट देण्यात आली आहे.

Amazon Great Summer Sale

Amazon ग्रेट समर सेल सुरू झाला आहे. हा प्राइम सेल 2 मे पासून सुरू झाला आहे. Amazon ग्रेट समर सेल दरम्यान जवळजवळ सर्वच प्रोडक्टवर डिस्काऊंट आणि डिल्स लिस्टेड आहेत. येथे स्मार्टफोन, एसी, गेमिंग ॲक्सेसरीज, टॅब्लेट, टीडब्ल्यूएस, स्मार्टवॉच, फिटनेस गॅझेट्स, लॅपटॉप आणि मोबाइल ॲक्सेसरीज इत्यादी स्वस्तात खरेदी करता येतात.

Amazon-Flipkart Sale
Samsung Galaxy : सॅमसंगचे दोन नवीन फोल्डेबल स्मार्टफोन लाँच; पाहा Z Flip 5 आणि Fold 5 चे फीचर्स अन् किंमत

Amazon सेल दरम्यान UPI ​​पेमेंटवर कॅशबॅक देखील मिळेल. लिस्टेड डिटेल्सनुसार, किमान 1500 च्या UPI पेमेंटवर 100 रुपयांचा कॅशबॅक मिळत आहे.

ॲमेझॉन ग्रेट समर सेल दरम्यान स्मार्टफोनवर अनेक आकर्षक डील उपलब्ध आहेत. येथे तुम्ही Samsung, Realme, Redmi आणि Vivo इत्यादी सारखे हँडसेट सहज खरेदी करू शकता. OnePlus 11R 27,999 रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो.ज्यावर अनेक ऑफर्स आहेत.

Amazon Great Summer Sale मध्ये तुम्ही AC वर 50% पर्यंत सूट मिळवू शकता, जी कमाल आहे. येथे 1.5 टन एसी 28290 रुपयांना खरेदी करता येईल.

Amazon-Flipkart Sale
Housing Sales: राज्यातील 'या' शहरांमध्ये घरांच्या मागणीत विक्रमी वाढ, किती वाढल्या किंमती?

अमेझॉन ग्रेट समर सेलमध्ये स्मार्ट टीव्हीवर चांगली सवलत देखील उपलब्ध आहे. येथे तुम्ही अगदी कमी किमतीत टीव्ही घरी आणू शकता. टीव्हीवर कमाल 35 टक्क्यांपर्यंत सूट देण्यात आली आहे. मोबाइल ॲक्सेसरीज, कार ॲक्सेसरीज इत्यादींवर चांगल्या सवलतींमधून ॲक्सेसरीजवरील सूटही मिळू शकते.

येथे तुम्ही मोबाईल TWS, चार्जर आणि चार्जिंग केबल इत्यादी स्वस्तात खरेदी करू शकता. तुम्ही कार डॅश चार्जर घरी सहज आणू शकता.

Amazon-Flipkart Sale
Republic Day Sale : फ्लिपकार्ट आणि अ‍ॅमेझॉनच्या सेलमध्ये आयफोनवर मिळतोय भरपूर डिस्काउंट, जाणून घ्या ऑफर्स

Flipkart Big Saving Days sale

फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज सेल आजपासून सुरू झाला आहे. या सेलमध्ये अनेक चांगल्या ऑफर आणि सवलती उपलब्ध आहेत. फ्लिपकार्टवर दिलेल्या डिटेल्सनुसार तुम्हाला अनेक प्रोडक्टवर 80% पर्यंत सूट मिळू शकते.

या सेल दरम्यान स्मार्टफोन, लॅपटॉप, होम अप्लायन्सेस, TWS, गेमिंग मॉनिटर्स आणि आयफोन इत्यादींवर चांगले डील देखील लिस्टेड केले आहेत. या सेल दरम्यान, कमाल 80 टक्क्यांपर्यंत सूट मिळू शकते.

फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डे सेल दरम्यान स्मार्टफोन्सवर चांगल्या सवलती उपलब्ध आहेत. येथे सॅमसंग, Realme, Redmi, Vivo, Motorola आणि Poco ब्रँडचे स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करता येतील. Samsung Galaxy S23 44,999 रुपयांना खरेदी करता येईल, ज्याची ओरिजिनल किंमत 64,999 रुपये आहे.

Amazon-Flipkart Sale
Flipkart Republic Day Sale : 14 जानेवारीपासून सुरु होणार सेल, iPhone 15 सह या फोनवर मिळेल बंपर सूट

iPhone 15 वर आहे भरगोस सूट

Apple iPhone देखील Flipkart Big Saving Days सेल दरम्यान डिस्काउंट मिळत आहे. या सेल दरम्यान यूजर्स 64999 रुपयांमध्ये iPhone 15 खरेदी करू शकतात. तसेच, iPhone 14 (128GB) ची किंमत 58999 रुपये आहे. फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज सेलमुळे AC वर प्रचंड डिस्काऊंटवर देखील मिळवू शकतात.

उन्हाळा सुरू झाला आहे आणि बरेच लोक त्यांच्या घरासाठी नवीन एसी घेण्याचा विचार करतात, त्यामुळे अशा लोकांसाठी ही एक चांगली संधी आहे. या कालावधीत, 10% बँक ऑफर देखील उपलब्ध आहे.

Amazon-Flipkart Sale
Amazon TV Deals: पैसा वसूल डील! Amazon Sale मध्ये मिळतंय बंपर डिस्काउंट, स्वस्तात खरेदी करु शकता स्मार्ट टीव्ही

Ac वर आहे सूट

फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज सेल अंतर्गत, वापरकर्ते AC वर प्रचंड सवलत देखील मिळवू शकतात. उन्हाळा सुरू झाला आहे आणि बरेच लोक त्यांच्या घरासाठी नवीन एसी घेण्याचा विचार करतात. त्यामुळे अशा लोकांसाठी ही एक चांगली संधी आहे. या सेलमध्ये, 10% बँक ऑफर देखील उपलब्ध आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com