Anant Ambani Marriage : रोख रक्कम, दागिने, संसार सेट अन् बरंच काही... अंबानी कुटुंबियांनी 'त्या' जोडप्यांना दिला आहेर

सोशल मीडियावर सध्या चर्चा सुरु आहे ती म्हणजे, अंबानी कुटुंबियांनी काल आयोजित केलेल्या सामुहिक विवाह सोहळ्याची.
ambani family organize samuh vivah know gifts for couple
ambani family organize samuh vivah know gifts for couple

सोशल मीडियावर सध्या चर्चा सुरु आहे ती म्हणजे, अंबानी कुटुंबियांनी काल आयोजित केलेल्या सामुहिक विवाह सोहळ्याची. हा सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. या सोहळ्यात 50 जोडप्यांनी सात फेरे घेतले. अंबानी परिवाराने केवळ जोडप्यांचे लग्नच लावले नाही तर त्यांना खुपसाऱ्या भेटवस्तुदेखील दिल्या आहेत. ज्याची चर्चा जोरदार सुरु आहे. (ambani family organize samuh vivah know gifts for couple)

अनंत अंबानी आणि राधिक मर्चंट यांच्या लग्नाला काहीच दिवस उरले आहेत. 12 जुलैला मुंबई येथे दोघे लग्नगाठ बांधणार आहेत. तत्पुर्वी अंबानी कुटुंबियांनी पालघरच्या 50 वंचित जोडप्यांच्या विवाहाचे आयोजन केले.

रिलायन्स कॉर्पोरेट पार्क येथे हा सोहळा पार पडला. या सोहळ्याला सुमारे 800 लोक सहभागी झाले होते. सामुहिक विवाह सोहळ्यात वधू-वरांच्या कुटुंबांव्यतिरिक्त सामाजिक कार्यकर्ते आणि सामाजिक संस्थांनीही सहभाग घेतला होता. या सोहळ्यादरम्यान अंबानी कुटुंबातील साधेपणा आणि त्यांची प्रथांप्रती असलेली निष्ठा दिसून आली.

ambani family organize samuh vivah know gifts for couple
Nita Ambani: लाल भडक साडीत वरमाईचा तोरा! निता अंबानी यांनी नेसलेली साडी करतेय हिंदू धर्माचा प्रसार

हा सोहळा अंबानी कुटुंबासाठी खास होता. यावेळी निता अंबानी यांनी नववधूंना आशीर्वाद दिले. तसेच, यावेळी लग्न झालेल्या प्रत्येक जोडप्याला भेटवस्तूही देण्यात आल्या.

तर त्या कोणत्या भेटवस्तु?

इकॉनॉमिक टाईम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, सर्व 50 वधूंना त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या गरजा लक्षात घेऊन त्यांच्या लग्नानिमित्त विशेष भेटवस्तू देण्यात आल्या. प्रत्येक नववधुला मंगळसूत्र, अंगठी आणि नथ, या दागिन्यांसह जोडवी, पैंजण यांसारखे चांदीचे दागिनेही देण्यात आले आहेत.

याशिवाय 1.01 लाख रुपयांचा धनादेश वधूला 'स्त्रीधन' म्हणून देण्यात आला, हा धनादेश वधूच्या नावाने देण्यात आला. याशिवाय लग्न करणाऱ्या जोडप्यांना वर्षभरासाठी लागणारे रेशन व घरगुती साहित्य, आवश्यक घरगुती उपकरणे आणि अंथरूणही देण्यात आले.

ambani family organize samuh vivah know gifts for couple
Nita Ambani : नीता अंबानींसाठी वाराणसीत तयार होतेय स्पेशल सोन्याची साडी, हातमागाला नीता यांनी दिली भेट

या सोहळ्यानंतर निता अंबानी यांनी माध्यमांशी संवाद साधला. नवीन जोडपे पाहून मला खूप आनंद झाला आहे. या सर्व जोडप्यांना मी आशीर्वाद देते. अनंत आणि राधिकाचा 'शुभ-लग्न' सोहळ्याला सामूहिक विवाह सोहळ्याने सुरुवात झाली आहे. अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com