Joe Biden Salute To PM Modi : बलाढ्य अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी PM मोदींना ठोकला कडक सॅल्यूट; संपूर्ण जगात फोटोचीच चर्चा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Joe Biden Salute To PM Modi

Joe Biden : बलाढ्य अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी PM मोदींना ठोकला कडक सॅल्यूट; संपूर्ण जगात फोटोचीच चर्चा

Joe Biden Salute To PM Modi: इंडोनेशियातील बाली येथे G-20 शिखर परिषदेत जगातील सर्व दिग्गज नेते एकत्र आले आहेत. पीएम मोदी देखील सध्या बालीमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत आहेत. यादरम्यान, त्यांनी जगभरातील नेत्यांच्या भेटी घेतल्या, परंतु त्यांचा बुधवार, 16 नोव्हेंबर 2022 चा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे.

हा फोटो बालीच्या खारफुटीच्या जंगलातील आहे. या जंगलात सर्व नेते मिळून वृक्षारोपण करत होते. यानंतर बिडेन आणि पीएम मोदी एकाच जागी बसलेले दिसत आहेत. तर एका फोटोमध्ये पीएम मोदींनीही सॅल्यूट करणाऱ्या बिडेन यांना हात दाखवत प्रत्युत्तर दिलं. सोशल मिडीयावर अनेकांनी हा फोटो शेअर केला आहे. दरम्यान पंतप्रधान मोदींनी ट्विटरवर या वेळचे फोटो शेअर केले आहेच, ज्यामध्ये पर्यावरण वाचवण्याचा संदेश देण्यासाठी जागतिक नेते खारफुटीच्या जंगलात रोपे लावत असल्याचे दिसत आहे.

हेही वाचा: Jitendra Awhad: तुमच्या नवऱ्याचं किंवा नेत्याचं अर्धनग्न छायाचित्र...; चित्रा वाघ यांना आव्हाडांचा संतप्त सवाल

यातील एका फोटोमध्ये पंतप्रधान मोदी, राष्ट्राध्यक्ष बिडेन आणि त्यांचे इंडोनेशियन नते जोको विडोडो कॅमेऱ्याकडे हसताना दिसत आहेत. दुसर्‍या फोटोमध्ये पंतप्रधान राष्ट्राध्यक्ष बिडेन आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी बोलत आहेत.

हेही वाचा - Gautami Patil Lavani: गौतमीची लावणी कुठे चुकतेय?

हेही वाचा: ST Employees : एसटी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! ३४ टक्के महागाई भत्ता लागू

रशिया-युक्रेन युद्धाबाबत भारताने अमेरिकेची भूमिका मान्य करण्यास नकार दिल्यानंतर पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष बिडेन यांच्यातील हा संवाद समोर आला आहे. भारत सातत्याने युद्धबंदीबाबत बोलत आहे आणि मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून संवादातून या संघर्षावर तोडगा काढण्याची भाषा करत आहे.