
Amruta Fadnavis : अमृता फडणवीसांचा वेगळा अंदाज; पतंग उडवत दिल्या...
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या सध्या सोशल मीडियावर चांगल्याच चर्चेत आहेत. "आज मैने मूड बना लिया है" हे त्यांचे पंजाबी गाणे नुकतेच प्रदर्शित झाले असून त्यामुळे त्यांच्या नावाची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे. त्यांनी आज मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
हेही वाचा - आर्थिक निर्णय घेताना बनू नका चिंतातूर जंतू....
अमृता फडणवीस आज वेगळ्या अंदाजात दिसून आल्या. त्यांनी गच्चीवर जाऊन पतंगबाजी केली आहे. त्याचा व्हिडिओ त्यांनी आपल्या इंस्टाग्रामवरून शेअर केला आहे. या व्हिडिओत त्या मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा देताना दिसत आहेत. तर तिळगूळ घ्या गोड गोड बोला असंही त्या म्हणतात.
"संक्रमण नवपर्वाचे, विकासाभिमुख महाराष्ट्राच्या उत्तुंग भरारीचे! मकरसंक्रमणाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा!" अशा शब्दांत त्यांनी संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तर त्यांनी मकरसंक्रांतीच्या मुहुर्तावर केलेल्या पोशाखामुळे त्यांना नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे.