

Ankita Nagar, daughter of vegetable vendors from Indore, overcame financial difficulties and three examination failures to become a Civil Judge, securing fifth rank in the Madhya Pradesh Civil Judge Class-II examination in 2022
esakal
इंदूर : परिस्थिती कितीही प्रतिकूल असली, तरी जिद्द, मेहनत आणि ध्येयाप्रती असलेली निष्ठा यांच्या जोरावर यश मिळवता येते, हे मध्य प्रदेशातील अंकिता नगर यांनी सिद्ध करून दाखवले आहे. इंदूरमध्ये हातगाडीवर भाजीपाला विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आई-वडिलांच्या मुलीने प्रतिकूल आर्थिक परिस्थितीवर मात करत न्यायाधीश होण्याचे स्वप्न पूर्ण केले. २०२२ मध्ये झालेल्या मध्य प्रदेश दिवाणी न्यायाधीश वर्ग-२ परीक्षेत त्यांनी पाचवा क्रमांक मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले.