
Video Viral : स्वप्न पूर्ण झाले! पोलीस प्रमुखांचा लेकीला पासिंग आऊट परेडमध्ये कडक सॅल्यूट
प्रत्येकाच्या आईवडिलांची आपल्या मुलाने किंवा मुलीने मोठं व्हावं अशी इच्छा असते. ते मुलांचा प्रत्येक लाड पुरवत असतात. पण जेव्हा मुलं आपल्या आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करतात तो क्षण त्यांच्या साठी सर्वश्रेष्ठ असतो. त्यांनी यावेळी जग ठेंगणं वाटत असतं. असाच एका पित्याचा आणि मुलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
हेही वाचा - अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस
दरम्यान, आसामचे पोलीस महासंचालक (डीजीपी), ज्ञानेंद्र प्रताप सिंग यांनी आपल्या ट्वीटरवर एक व्हिडिओ शेअर केला असून त्यांनी आपल्या लेकीला एका कार्यक्रमात कडक सॅल्यूट केला आहे. त्यांची मुलगी ऐश्वर्या सिंग ही सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीमधून पदवीधर झाली आहे. त्यांचा पदवीप्रदान सोहळा दिमाखात पार पडला. यावेळी त्यांची मुलगी आणि त्यांनी एकमेकांना समोरासमोर सॅल्यूट केला आहे.
यावेळी ज्ञानेंद्र प्रताप सिंग यांचे कुटुंबिय या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. या कार्यक्रमाचेही फोटो त्यांनी आपल्या ट्वीटरवरून शेअर केले आहेत.