Viral Video : या आंटीचा डान्स पाहून प्रभुदेवाने घातली असती मांडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Viral Video

Viral Video : या आंटीचा डान्स पाहून प्रभुदेवाने घातली असती मांडी

आपण आपल्या उभ्या आयुष्यात खूप डान्स पाहिले असतील. नाद करायचा नाय पाहुणं... या गाण्यावरील ४४० व्होल्टचा डान्स काही काळापूर्वी चांगलाच व्हायरल झाला होता. त्यानंतर आता एका आंटीचा डान्स व्हायरल होत आहे. त्या डान्सची स्पीड पाहून तुम्हाला धक्का बसणार आहे.

हेही वाचा - ..तर तुम्हालाही मिळू शकेल इन्कमटॅक्सचा जुना रिफंड

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक आंटी घराच्या समोर होत असलेल्या कार्यक्रमात डान्स करताना दिसत आहे. तर डान्स करता करता तिला लाईटचा करंट बसल्यासारखं आपल्याला वाटेल. पण थांबा. तिला करंट लागला नसून ती तिच्या डान्सची स्पीड आहे. तिचं लवचिक शरीर आणि भन्नाट डान्स म्हणजे नाद खुळा! हा डान्स पाहून प्रभुदेवाने सुद्धा मांडी घातली असती अशा कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

दरम्यान, हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून अनेकांनी त्या व्हिडिओवर कमेंट केल्या आहेत. हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर अडीच लाख लोकांनी लाईक केला असून या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी केलेल्या कमेंट वाचून तुम्ही पोट धरून हसाल. तर हा व्हिडिओ अनेकांनी शेअर केलाय.