
Beed Latest News: बीडमध्ये कधी काय घडेल, हे सांगता येत नाही. खून, दरोडे, बलात्कार, महिला अत्याचार, या घटना नेहमीच्या झाल्या आहेत. त्यातच आता एक आश्चर्यकारक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. रस्त्याचं काम सुरु असताना त्याची पाहाणी करायला गेलेल्या अभियंत्यासमोरच ट्रक कोसळला. उपस्थितांना कसाबसा जीव मुठीत धरुन पळावं लागलं.