

Viral Video: इराणमधील एका समुद्रकिनाऱ्यावर झालेल्या एका अद्वितीय नैसर्गिक घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. जोरदार पावसात समुद्राचे पाणी रक्तासारखे लाल झाले आणि अनेकांनी या घटनेला ‘ब्लड रेन’ (Blood Rain) म्हणत भीती व्यक्त केली. काही जणांनी याला दैवी प्रकोप म्हणत तर काहींनी हवामानातील बदलांशी जोडले. मात्र, या घटनेमागे वैज्ञानिक कारण आहे, आणि ते जाणून घेणं महत्त्वाचं आहे.