#BOYCOTTSonyTV : 'क्राईम पेट्रोल'मध्ये श्रद्धा मर्डर केस! अफताबला हिंदू मुलगा दाखवल्यानं वातावरण तापलं! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shraddha walkar case

#BOYCOTTSonyTV : 'क्राईम पेट्रोल'मध्ये श्रद्धा मर्डर केस! अफताबला हिंदू मुलगा दाखवल्यानं वातावरण तापलं!

श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाने अख्खा देश हादरला होता. अफताब नावाच्या एका मुलाने श्रद्धाच्या शरीराचे ३५ तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवल्याचं तपासातून समोर आलं होतं. त्यानंतर या अफताब हा तिचा प्रियकर असून हत्येनंतर काही महिन्यानंतर या प्रकरणाचा उलगडा झाला होता. तर या केसवर सोनी टीव्हीच्या क्राईम पेट्रोलने एक एपिसोड बनवला आहे. त्यावरून सध्या वाद सुरू झाला आहे.

हेही वाचा - Inside Online Dating : हुक अप्स, ओपन रिलेशनशिप्स की...; महाराष्ट्रातील तरुणाई नक्की काय शोधते?

दरम्यान, क्राईम पेट्रोलमध्ये अफताब या तरूणाला हिंदू मुलगा असल्याचं दाखवल्यामुळे नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. तर सोनी टीव्हीवर बंदी आणण्याची मागणी केली आहे. ट्वीटरवर #BoycottSonyTV असा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. त्यामुळे आता सोनी टीव्ही अडचणीत येण्याची शक्यता आहे.

bycott sony tv

bycott sony tv

क्राईम पेट्रोलच्या या एपिसोडमध्ये अफताब हा हिंदू मुलगा दाखवला असून या मालिकेती मिहीर असं त्याचं नाव आहे. तर श्रद्धाला ख्रिश्चन दाखवलं असून तिचे नाव एना फर्नांडेस असं दाखवण्यात आलं आहे. हिंदू मुलांना ठरवून बदनाम करण्यात येत असल्याचा आरोप नेटकऱ्यांनी केला असून अनेकांनी ट्वीटरवर सोनी टीव्हीच्या या कार्यक्रमावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.