Video Viral : ट्राफिकमध्ये कार अडकली; नवरी मेट्रोने पोहोचली लग्न मंडपात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video Viral

Video Viral : ट्राफिकमध्ये कार अडकली; नवरी मेट्रोने पोहोचली लग्न मंडपात

बंगळुरू : सध्या कर्नाटकातील बंगळूरू येथील एका नवरीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आपली गाडी ट्राफिकमध्ये अडकली म्हणून या नवरीने मेट्रोचा आधार घेत लग्नाच्या हॉलपर्यंत पोहोचायचं ठरवलं आणि ती पोहचलीही. त्यानंतर या नवरीचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.

हेही वाचा - प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

या मुलीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नातेवाईकांनी आणि नवरीच्या मैत्रिणीने हा व्हिडिओ शेअर केला आहे. तर ट्राफिकमुळे लग्न कँन्सल झाले असते पण मेट्रोमुळे हे लग्न वेळेत लागू शकले असं मत अनेक नेटकऱ्यांनी व्यक्त केलं आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये सदर मुलगी मेट्रोमधून प्रवास करताना दिसत आहे. लग्नाच्या थोडा वेळ आधी ती लग्नाच्या हॉलपर्यंत पोहोचली आहे.

दरम्यान, forever bengaluru या ट्वीटर अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. तर या व्हिडिओवर अनेकांनी आपल्या मजेशीर कमेंट केल्या आहेत. त्याचबरोबर या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून पसंती मिळत असून युजर्सने हा व्हिडिओ लाईक केला आहे.