Viral Video : क्रिएटिव्हिटीचा कहर! बटर चिकन आईस्क्रीम विथ ग्रीन चटणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Viral Video :  क्रिएटिव्हिटीचा कहर! बटर चिकन आईस्क्रीम विथ ग्रीन चटणी

Viral Video : क्रिएटिव्हिटीचा कहर! बटर चिकन आईस्क्रीम विथ ग्रीन चटणी

सोशल मीडियावर दररोज मोठ्या प्रमाणात विविध विषयांवरील व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्याची जोरदार चर्चादेखील होते. मात्र, सध्या एका व्हिडिओची आणि लोकांच्या क्रिएटिव्हिटीची जोरदार चर्चा होत आहे. व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती बटर चिकन आईस्क्रीम विथ ग्रीन चटणी सोबत सर्व्ह करताना दिसून येत आहे. शेफची ही क्रिएटिव्हिटी पाहून यूजर्सने हेच पाहयचं राहिलं होतं असे म्हटले आहे. फूडवूडइंडियाने हा व्हिडीओ शेअर केला आहे.

व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओला 1 लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले असून, अनेक यूजर्सने ही क्रिएटिव्हिटी ट्राय करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तर, काहींनी हेच दिवस बघायचे राहिले होते असे म्हणत नाराजी व्यक्त केली आहे.

व्हिडिओमध्ये एक व्यक्ती केशरी रंगाचे आईस्क्रीम बाऊलमध्ये सर्व्ह करताना दिसून येत असून, बाऊल बर्फांमध्ये ठेवलेले आहे. केसरी रंगाचे आईस्क्रीम सर्व्ह करत नसून, आईस्क्रीमवर हिरव्या रंगाची चटनी आणि बटरसुद्धा सर्व्ह करतोय. व्हिडिओ शेअर करताना याखाली आम्ही बटर चिकन आईस्क्रीम बनवल असून, हे बटर चिकनच्या प्युरी पासून बनवल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.