
Viral Video : मांजराचा वाढदिवस, जंगी पार्टीचं नियोजन; बर्थडे गर्ल बावरली
अनेक लोकांना घरात मांजर पाळण्याची सवय असते. आपल्याही घरात मांजर असेल. पण आपण कधी मांजराचा वाढदिवस लक्षाच ठेवला नसेल. लक्षात जरी ठेवला असेल तर वाढदिवस साजरा करण्याचा व्हिडिओ आपण पहिल्यांदाच पाहत असाल. सध्या या मांजराच्या बर्थडे पार्टीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एका मांजराला फुगे आणि फुलांनी सजवलेल्या टेबलवर बसवलेलं दिसत असून जंगी सिलेब्रेशन केलं जात आहे. तर त्यानंतर घरच्या व्यक्तींकडून डान्स केला जात आहे. ही जंगी पार्टी पाहून मांजरही बावरलं आहे. "ही तर बर्थडे गर्ल" अशा कमेंट नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर केल्या आहेत.
दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून पसंती मिळत असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून लाईक केलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवून जात असतात.
सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये विनोदी व्हिडिओ, डान्स व्हिडिओ, लग्नातील व्हिडिओ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओचा सामावेश असतो. सध्या सोशल मीडिया हे तरूणांच्या मनोरंजनाचे साधन बनले आहे.