

Chimpanzee “Civil War” in Uganda Turns Deadly: 28 Killed as Former Allies Become Enemies
esakal
युगांडातील किंबाले राष्ट्रीय उद्यानात चिंपांझींच्या एका मोठ्या समुदायात भयानक संघर्ष सुरू झाला आहे. हॉलीवूडच्या ‘प्लॅनेट ऑफ द एप्स’ चित्रपट मालिकेतील काल्पनिक कथेला हा संघर्ष साक्षात करून दाखवतो आहे. पूर्वी एकत्र राहणारे चिंपांझी आता दोन गटांत विभागले गेले असून, त्यांच्यातील रक्तरंजित लढाया इतक्या हिंसक बनल्या आहेत की, आतापर्यंत २८ हून अधिक चिंपांझी ठार झाले आहेत आणि अनेक बेपत्ता आहेत.