Viral Video: भात मागण्यासाठी चीनी लोक वापरताहेत मिथूनचं गाणं

चीनमध्ये मिथूनदाचं गाणं ‘जिमी जिमी आजा आजा’ चांगलचं व्हायरल होत आहे.
viral video
viral videosakal

चीनमध्ये कोरोनाविरोधात लावण्यात आलेल्या झिरो कोविड ​​​​पॉलिसी (Zero Covid Policy)ला घेऊन जोरदार विरोध सुरू आहे. विशेष म्हणजे या दरम्यान भारतीय दिवंगत सिंगर बप्पी लाहिरी म्हणजेच मिथूनदाचं गाणं ‘जिमी जिमी आजा आजा’ चांगलचं व्हायरल होत आहे.

हे गाणे 1982 च्या "डिस्को डांसर" या चित्रपटातील आहे. सध्या चिनी लोक या गाण्यावरुन सरकारला ट्रोल करत आहे. ‘जि मी, जि मी’ ला चीनी भाषेत 'मला भात हवा, मला भात हवा' असा अर्थ होतो. ( Chinese using song of bappi lahiri Jimmy Jimmy Aaja Aaja to express their anger over the country's zero COVID policy )

viral video
Instagram Reels : भारतीयांसाठी Instagram ची खास दिवाळी ऑफर, रील्स बनवा अन्...

व्हिडीओत तुम्हाला दिसेल की चीनचे लोक खाली भांडी दाखवत ‘जि मी, जि मी’ गाण्यावर रिल करत आहे. लॉकडाउनदरम्यान चीनच्या लोकांचे खाण्याचे खूप हाल झाले. यावरुनच झिरो कोविड ​​​​पॉलिसीला घेऊन अशा रिल्स बनवून चीनचे लोक जोरदार टिका करत आहे.

viral video
Viral Love Story: ड्रायव्हरनं टाकला असा गियर की करोडपती मुलगी पडली प्रेमात

चीनमध्ये एक सुद्धा कोरोना पॉजिटिव केस समोर आल्यानंतर लोकांना क्वारंटाइन सेंटरमध्ये ट्रांसफर केले जाते. सध्या बप्पी लहरीचं गाणं खूप व्हायरल होत असून या गाण्यावर बनवलेल्या रिल्स सुद्धा प्रचंड गाजत आहेत. सध्या नेटकरी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com