Video : जेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकनाथ शिंदेंना भेटतात

Viral
Viral Sakal
Updated on

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाचा भेटायला गेले आहेत. ऐकून आपल्यालाही धक्का बसला असेल ना? पण हे खरंय. पुण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारखा दिसणारा एक तरूण आहे. मुख्यमंत्री शिंदे आणि त्या तरूणामध्ये काहीच फरक दिसत नाहीये.

(Duplicate Eknath Shinde Viral Video)

या डुप्लिकेट एकनाथ शिंदेचं नाव आहे विजयराज माने. राज्यात सत्तांतर झालं आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर विजयराज माने या तरूणाची हवा झाली. तो काही दिवसांतच फेमस झाला होता. त्यानंतर आता त्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. पण मुख्यमंत्री आणि हा तरूण समोरासमोर आल्यानंतर खरा मुख्यमंत्री कोण हा प्रश्न आपल्यालाही पडेल.

दरम्यान, विजयराज माने या पुण्यातील आंबेगाव पठार येथील तरूण. या तरूणाला गणेशोत्सव काळात अनेक सुपऱ्या मिळाल्याच्याही चर्चा होत्या. अनेक गणेश मंडळे त्याला आरतीसाठी निमंत्रण देत होती. काही दिवसांतच स्टार झालेल्या या तरूणाने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आपल्या परिसरातील प्रश्न मांडले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com