Video Viral : मोबाईलद्वारे पेटवली रावणाची प्रतिकृती; कॉलेजच्या पोरांचा पराक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video Viral : मोबाईलद्वारे पेटवली रावणाची प्रतिकृती; कॉलेजच्या पोरांचा पराक्रम

Video Viral : मोबाईलद्वारे पेटवली रावणाची प्रतिकृती; कॉलेजच्या पोरांचा पराक्रम

सध्या नवरात्री उत्सवामुळे सगळीकडे उत्साहाचं वातावरण चालू आहे. त्याचबरोबर विजयादशमीच्या निमित्ताने रावणाच्या पुतळ्याची प्रतिकृती जाळण्यासाठीही सगळीकडे तयारी चालू असून सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. कॉलेजच्या पोरांचा हा व्हिडिओ असून मोबाईलच्या मदतीने रावणाची प्रतिकृती जाळण्यात येत आहे.

दरम्यान, व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ उत्तरप्रदेशमधील गोरखपूर येथील आहे. गोरखपूर इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांनी हा प्रोजेक्ट केला असून मोबाईलच्या माध्यमातून प्रतिकृती जाळण्याचा शोध त्यांनी लावला आहे. विजयादशमीच्या रावण दहनाच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर हा शोध महत्त्वाचा ठरू शकतो. तर हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.

दरवर्षी हजारो लोक रावणाची प्रतिकृती जाळत असतात. त्याचबरोबर प्रतिकृतीमध्ये फटाके किंवा दारू टाकून हे जाळण्यात येते. कधीकधी यामुळे दुर्घटना होत असतात. या दुर्घटनेमध्ये अनेक लोक जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर या विद्यार्थ्यांनी लावलेला शोध वखाणण्याजोगा आहे.

टॅग्स :studentCollegeviral video