
न्यूयॉर्क ते फ्लोरिडा जाणाऱ्या जेटब्ल्यू फ्लाइटमध्ये एका जोडप्याने मुलांसमोर अश्लील कृत्य केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर ट्रिस्टा रीली (वय 43) आणि ख्रिस्तोफर ड्र्यू अर्नोल्ड (वय 42) या जोडप्याला अटक करण्यात आली. ही घटना 19 जुलै 2025, शनिवारी घडली. WWSB च्या अहवालानुसार, या जोडप्याने विमानात "माइल हाय क्लब" मध्ये सामील होण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे प्रवाशांमध्ये संताप पसरला.