Viral : लोकं कुठं काय करतील नेम नाही; MRI मशिनमध्येच जोडप्याने केला सेक्स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MRI

Viral : लोकं कुठं काय करतील नेम नाही; MRI मशिनमध्येच जोडप्याने केला सेक्स

शारिरीक संबंधादरम्यान शरीरामध्ये काय काय बदल होत असतात या विषयावर शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनाचा एक फोटो टीक टॉकवर व्हायरल होत आहे. खरं तर हे संशोधन काही वर्षापूर्वी केले होते. यासाठी वैज्ञानिकांनी MRI मशीनच्या आतमध्ये जोडप्याला शारिरीक संबंध करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तो फोटो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

हेही वाचा - जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

हे संशोधन १९९१ ते १९९९ दरम्यान करण्यात आला होता. या संशोधनासाठी इडा सबेलिस आणि त्यांच्या प्रियकर असलेल्या जुप याने सहभाग घेतला होता. इडा यांच्या मित्राच्या सांगण्यावरून त्यांनी या संशोधनासाठी सहभाग घेतला होता असं सांगितलं आहे. शारिरीक संबंधादरम्यान महिलांच्या शरिरीत होणारे बदल या संशोधनातून समोर आणण्याचा प्रयत्न केला गेला.

MRI

MRI

एम्स्टर्डम येथील Vrije University मध्ये हे संशोधन पार पडले असून इडा हिने सांगितलं की त्यांनी स्पूनिंग पोझिशनमध्ये सेक्स केला होता. तर या संशोधनातून महिलांचा प्रायव्हेट पार्टचे छिद्र हे सरळ नाही हा खुलासा झाला. अनेक वर्षापासून महिलांचा प्रायव्हेट पार्टचे छिद्र हे सरळ असल्याच्या चर्चा होत्या. १९४२ मधील लिओनार्डो द व्हीन्सी यांच्या एका पेंटिंगमध्ये महिलांच्या प्रायव्हेट पार्टला सिलेंडर सारखं दाखवण्यात आलं होतं.

या संशोधनात अनेक जोडप्यांनी भाग घेतला होता. त्यावेळच्या या संशोधनातून अनेक लैंगिक खुलासे झाले होते.

टॅग्स :photoviral post