Viral News : उपरवाला जब भी देता... महिलेला एकाचवेळी झाली चक्क पाच बाळं l Couple Welcoming Quintuplets Viral News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Viral News

Viral News : उपरवाला जब भी देता... महिलेला एकाचवेळी झाली चक्क पाच बाळं!

Couple Welcoming Quintuplets : निसर्गाचा चमत्कार माणसाच्या कल्पनेच्या पलिकडे असतो. जुळी, तिळी मुलं होणं, मुलं एकमेकांना जोडलेली असणं किंवा काहीतरी व्यंग असणं अशा बऱ्याच आश्चर्यकारक घटना आपण अनेकदा ऐकतो. पण एखाद्या बाईला एकाचवेळी पाच मुलं होणं... असं काही क्वचितच ऐकायला मिळतं.

Viral News

Viral News

विन्स क्लार्क आणि पत्नी डॉमिनिका या जोडप्याला आधीचे ७ मुलं आहेत. त्यांनी वर्षभरापुर्वी अजून एक मुलं होऊ देण्याचा निर्णय घेतला. पण देवाच्या मनात वेगळंच काहीतरी होतं बहुतेक. या दांपत्याला quintuplets म्हणजे एकाचवेळी पाच मुलं झाली. असा प्रकार फार क्वचित घडत असल्याचं तज्ज्ञांच म्हणणं आहे. त्यामुळे ब्रिटीश विन्स आणि पोलिश डॉमिनिका हे आता १२ मुलांचे पालक झाले आहेत.

डॉमिनिकाने पोलंडमधील क्राको येथील युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमध्ये तीन मुली आणि दोन मुलांना जन्म दिला. त्यांना आधीच दोन जुळी मुले आणि इतर तीन मुले आहेत. या प्रकाराला मुलांची आई चमात्कार म्हणते. कारण डिलीव्हरी झालेल्या त्या हॉस्पिटलमध्येही अशी घटना ५२ दशलक्ष रुग्णांमध्ये एकमेव आहे.

टॅग्स :pregnancywomen pregnancy