Kalyan Assembly Election eskal
Trending News
Maharashtra Assembly Election: कार्यकर्त्यांचा अतिउत्साह उमेदवाराच्या जीवाशी, फटाक्यांमुळे केसांना लागली आग, पहा व्हिडिओ
kalyan Assembly Election : कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहचला आहे. पण हाच अतिउत्साह मात्र एका उमेदवाराला चांगलाच महागात पडला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची आज सांगता होणार आहे, प्रत्येक उमेदवार ताकदीने मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रचाररसभा,रोड शोचे आयोजन केले जात आहे, उमेदवारांसोबतच कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहचला आहे. पण हाच अतिउत्साह मात्र एका उमेदवाराला चांगलाच महागात पडला आहे. पश्चिम कल्याणमध्ये प्रचार रोड शो दरम्यान कार्यकर्त्यांनी फटाके फोडल्याने उमेदवाराच्या डोक्यावरचे केस जळाल्याचा प्रकार समोर आला आहे. याच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
