King Cobra : फणा काढून पाणी पिणारा नाग पाहिलाय का? पाहा Video | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Cobra

King Cobra : फणा काढून पाणी पिणारा नाग पाहिलाय का? पाहा Video

साप पाहिला की आपल्या अंगावर काटा येतो. अनेकदा समोरासमोर साप पाहिला की आपली पळता भुई थोडी होते. पण सापाला अगदी दोन फूट अंतरावरून पाहण्याचा योग कधी आलाय का? सध्या सोशल मीडियावर एका नागाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये तो फणा काढून पाणी पिताना दिसत आहे.

हेही वाचा - रायगडमध्ये पर्यटनासाठी येतेय नवी संधी

व्हायरल होत असलेला व्हिडिओ आपल्या अंगावर काटा आणणारा आहे. त्यामध्ये तो मोठा फणा काढून उभा आहे. तर एकजण त्याला पिण्यासाठी वरून पाणी ओतताना दिसत आहे. हा व्हिडिओ त्याच्या अगदी जवळून शूट करण्यात आला आहे. तर हा व्हिडिओ पाहून आपल्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.

दरम्यान, इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओला ५० हजारांपेक्षा जास्त लोकांनी लाईक केलं असून त्यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. तर हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात शेअर केला जात आहे.

टॅग्स :Cobrasnakeviral video