Deepika Padukone: काय सांगता, दीपिकाच्या 'त्या' साडीची किंमत 1.92 लाख, तर ब्लाऊजची किंमत तब्बल...

अनंत आणि राधिका यांच्या संगीत सोहळ्याला दीपिकाने जांभळ्या रंगाची रत्नजडित साडी नेसली होती. तिचा हा साडीचा लुक चांगलाच चर्चेत राहिला.
Deepika Padukone: काय सांगता, दीपिकाच्या 'त्या' साडीची किंमत 1.92 लाख, तर ब्लाऊजची किंमत तब्बल...

सध्या बॉलिवुड जगात अनंत राधिकाच्या लग्न सोहळ्याची चर्चा सुरु असली तरी 'मॉम टू बी' होणारी बॉलीवुडची मस्तानी दीपिकाही तितकीच चर्चेत आहे. दीपिका लवकरच आई होणार आहे. सप्टेंबरमध्ये ती आपल्या बाळाला जन्म देणार आहे. दरम्यान, दीपिकाने अनंत राधिकाच्या संगीत सोहळ्याला आपली उपस्थिती लावली होती. यावेळी सर्वांच्या नजरा दीपिकावरच खिळल्या होत्या. त्याचे कारणही तसेच होते.(deepika padukone wearing hukum ki raani saree rs1 92lakh Took Over 3400 anant radhika sangeet )

अनंत आणि राधिका यांच्या संगीत सोहळ्याला दीपिकाने जांभळ्या रंगाची रत्नजडित साडी नेसली होती. तिचा हा साडीचा लुक चांगलाच चर्चेत राहिला. दरम्यान आता तिच्या या साडीची आणि मॅचिंग ब्लाऊजची किंमत समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दीपिकाच्या या साडीची किंमत 1.92 लाख आहे तर मॅचिंग ब्लाऊजची किंमत ४६,५०० रुपये इतकी आहे.

Deepika Padukone: काय सांगता, दीपिकाच्या 'त्या' साडीची किंमत 1.92 लाख, तर ब्लाऊजची किंमत तब्बल...
Anant Radhika Wedding : लग्न अनंत राधिकाचे, पण इम्पॅक्ट मुंबईतील वाहतुकीवर; मार्गात अनेक बदल

तर या साडीची काय आहे खासीयत?

स्टायलिस्ट शालिना नैथानी आणि अंजली चौहान यांनी ही दीपिकाची साडी तयार केली आहे. ही साडी करण तौरानीने खास दीपिकासाठी बनवली आहे. दीपिकाची सुंदर जांभळी साडी तौरानीच्या वॉर्डरोबमधील आहे. या साडीचे फॅब्रिक ऑर्गेन्झा आणि जेनी सिल्क पद्धतीचे आहे. या साडीचे वैशिष्ट्य म्हणजे त्यावर हाताने भरतकाम केले आहे. हि साडी तयार करण्यासाठी सुमारे ३,४०० तास लागले.

साडीवर मोती, जरी, तारे वर्क करण्यात आलं आहे. तोरानी लेबलच्या या साडीला हुकूम की 'रानी साडी' सेट म्हटले जाते. हे त्यांच्या काऊचर कलेक्शन लीला मधील आहे.

Deepika Padukone: काय सांगता, दीपिकाच्या 'त्या' साडीची किंमत 1.92 लाख, तर ब्लाऊजची किंमत तब्बल...
Anant-Radhika Wedding : श्रीमंत अंबानींचे व्याहीही काही कमी नाहीत; मर्चंट, पिरामल, मेहताही आहेत अज्बाधीश

दीपिकाने तिच्या या खास साडीतील लुक आपल्या इंस्टावर शेअर केला होता. यावेळी ती बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसली. यामध्ये दीपिका खुपचं सुंदर दिसत होती. दीपिका साडीच्या लेबलनुसार हुकूम की रानी दिसत होती असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com