Viral Video : स्वर्गाला टच करून आला परत! खायला आलेल्या चित्ता-तरसाला हरणाने बनवलं उल्लू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Viral Video

Viral Video : स्वर्गाला टच करून आला परत! खायला आलेल्या चित्ता-तरसाला हरणाने बनवलं उल्लू

सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यापैकी काही मजेशीर तर काही भावनिक व्हिडिओ असतात. तर काही व्हिडिओ पाहून आपल्यालाही आपल्या नशिबावर विश्वास बसू लागतो. असाच एका हरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ जंगलातील आहे.

हेही वाचा - शेअर बाजारात सततचे लाॅसेस? मग यापैकी कुठली चूक होतेय? घ्या जाणून

व्हायरल होत असलेला व्हिडिओ हरिण कसा मरणाच्या धाडेतून सुटका करून घेतो यासंदर्भात आहे. दोन दोन शिकारी प्राण्यांनी हल्ला करूनही मोठ्या शिताफीने तो दोन्ही प्राण्यांना गुंगारा देऊन आपली सुटका करून घेतो. दरम्यान पहिल्यांदा त्यांच्यावर चित्त्याने हल्ला केल्याचं आपल्याला व्हिडिओमध्ये दिसत आहे.

दरम्यान, चित्त्याने हल्ला केल्यानंतर तरस पळत येतो आणि चित्त्याला पळून लावतो आणि हरणाचे लचके तोडू लागतो. त्यानंतर चित्ता त्याच्याकडे येण्याचा प्रयत्न करतो आणि तरस चित्त्यावर हल्ला करण्यासाठी बाजूला जातो तोच हरिण उठून पळून जाते. ते मेल्याची फक्त अॅक्टिंग करत असल्याचं आपल्याला व्हिडिओच्या शेवटी लक्षात येते.

तर हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल केला जात आहे. ट्वीटरवर या व्हिडिओला अनेकांनी लाईक केलं असून त्यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

टॅग्स :deerviral video