मोठा Scam! OverActingचे 50 रूपये कट करा; कुत्र्याचा हा Video पाहाच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Viral

मोठा Scam! OverActingचे 50 रूपये कट करा; कुत्र्याचा हा Video पाहाच

एखादी गोष्ट मिळवण्यासाठी आपण कधीकधी एखाद्याला आमिष दाखवत तर कधीकधी एखाद्याला खोटं बोलतो. आपण आपल्या जीवनात असं एकदातरी केलं असेल पण एखादा प्राणी आपल्याकडून एखादी वस्तू मिळवण्यासाठी आपल्यालाच फसवतो हे आपण पहिल्यांदा ऐकलं असेल. सध्या व्हायरल होत असलेल्या कुत्र्याचा व्हिडिओ पाहून आपल्यालाही धक्का बसेल.

(Dog Viral Video)

रस्त्यावरील एका कुत्र्याचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून तो एका पायाने अपंग असल्याचं दाखवत आहे पण त्याला खायला मिळाल्यावर तो जोरात पळून जातानाही आपल्याला या व्हिडिओत दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून आपणही म्हणाल की, "ओव्हर अॅक्टिंगचे ५० रूपये कट करा" तर असा व्हिडिओ आपणही पहिल्यांदाच पाहत असाल.

नेटकऱ्यांकडून सध्या या व्हिडिओवर प्रतिक्रिया येत असून अनेकजण या व्हिडिओला शेअर करत आहेत. हा कुत्रा आपल्याला कसा फसवू शकतो असा प्रश्न तुम्हाला पडला असेल पण प्राणी खूप हुशार असतात हेही आपल्याला माहिती असायला हवं. आपल्या सवयी त्यांना माहिती झाल्या की आपल्याला फसवणं त्यांना खूप सोपं जातं.

टॅग्स :Dogviral video