

A brave man climbs an electric pole to rescue a frightened dog that fell from a residential balcony and got stranded several feet above the ground
esakal
एका कुत्र्याचा जीव वाचवण्यासाठी तरुणाने केलेल्या धाडसी प्रयत्नाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. इमारतीच्या वरच्या मजल्यावरील बाल्कनीतून खाली पडलेला कुत्रा रस्त्यावरील विजेच्या खांबावर अडकला होता. खाली उतरण्याचा मार्ग न सापडल्याने तो अनेक फूट उंचीवर अडकून पडला होता. अशा परिस्थितीत एका तरुणाने स्वतःचा जीव धोक्यात घालून खांबावर चढत कुत्र्याची सुखरूप सुटका केली. या कृतीचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे.