
Drunker Trying To Sit On Bike Funny Viral Video : सोशल मीडियावर दारूड्या लोकांच्या व्हिडीओजची धूम असते. रोज नवनवीन व्हिडीओज पडतच असतोत. बऱ्याचदा या लोकांचे कारनामे बघणाऱ्यांना हसवत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या गाजत आहे. ज्यात एक बेवडा बाइकवर बसण्याचा प्रयत्न करत आहे.
यात आपण बघू शकतो की, त्या दारू पिऊन धूत असलेल्या इसमाला घ्यायला एक जण बाइक घेऊन उभा आहे. पण हा पठ्ठ्या स्वतःवरचा सर्व ताबाच गमावून बसल्याने कधी इकडे तर कधी तिकडे लुडकत आहे. त्यामुळे त्याचा गाडीवर बसण्याचा प्रयत्नच व्हिडीओ बघणाऱ्यांच भरपूर मनोरंजन करतो. पण गोष्ट इथे थांबत नाही.
त्याच्या प्रयोत्नांनी जेवढं हसायला येतं त्याचा कळस तर खर व्हिडीओच्या शेवटाला गाठला जातो. बाइकवर बसण्याच्या प्रयत्नात अनेकदा इकडे तिकडे खाली पडल्यावर अखेर हा इसम बाइकवर बसण्यात यशस्वी होतो खरा. पण त्याला त्याचा तोल सांभाळता येत नसल्याने ड्रायव्हर सकट गाडीलाही घेऊन खाली पडतो.
हा व्हिडीओ सध्या जोरदार चालत आहे. याला भरभरून लाइक्स आणि शेअर केलं जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.