Viral Video : 'मरणाच्या तोंडावर असतानाही पोटच्या लेकराने सोडली नाही आईची साथ' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Viral Video

Viral Video : 'मरणाच्या तोंडावर असतानाही पोटच्या लेकराने सोडली नाही आईची साथ'

सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये विनोदी व्हिडिओ, डान्स व्हिडिओ, लग्नातील व्हिडिओ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओचा सामावेश असतो. सध्या सोशल मीडिया हे तरूणांच्या मनोरंजनाचे साधन बनले आहे.

पण सध्या एका हत्तिणीचा आणि तिच्या पिल्लाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या मायलेकराचा व्हिडिओ पाहून आपल्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही.

हेही वाचा - ट्रेडिंग कुठल्याही प्रकारचे असो 'स्टाॅप लाॅस' हवाच

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक हत्तीण आणि तिचे पिल्लू चिखलात फसल्याचं दिसत आहे. तर मरण तोंडावर असताना पिल्लू आपल्याच आईकडे झेप घेताना दिसत आहे. ते पिल्लू आपला जीव वाचवण्याचं सोडून आपल्या जन्मदात्या आईकडे धावत आहे.

काही व्यक्ती त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असून पिल्लू आपल्या आईला सोडायला तयार नसल्याचं या व्हिडिओत दिसत आहे. तर अनेकांनी या व्हिडिओवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून चांगलीच पसंती मिळत असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून लाईक केलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवून जात असतात.

टॅग्स :motherElephantviral video