
Elephant Latest News: सोशल मीडियामध्ये एका हत्तीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा हत्ती आपल्या सोंडेमध्ये चक्क ब्रश धरतो आणि कॅन्व्हासवर चित्र रेखाटतो. हे चित्र दुसऱ्या तिसऱ्या कुणाचं नाही तर हत्तीचंच आहे. चित्र काढताना या हत्तीकडून जराही रेष इकडेतिकडे होत नाही. एखाद्या सराईत चित्रकाराने जणू हे चित्र रेखाटलं आहे.